श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन Shravan Bal Seva State Pension Scheme
👵 योजना कोणासाठी?
ही योजना ६५ वर्षांवरील निराधार व वृद्ध नागरिकांसाठी आहे, ज्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत नाही.
📄 आवश्यक कागदपत्रे:
विहीत नमुन्यातील अर्ज
वयाचा दाखला (किमान वय ६५ वर्षे)
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला (किमान १५ वर्षांचा)
उत्पन्नाचा दाखला – वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹21,000/- पेक्षा कमी असावा
आधार कार्ड
रेशन कार्ड
निवडणूक ओळखपत्र
बँक पासबुकची झेरॉक्स
अर्जदाराचा फोटो
टीप: लाभार्थी BPL यादीत नसावा.
💰 लाभ काय?
अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा ₹1500/- निवृत्तीवेतन दिले जाते.
📝 अर्ज कुठे करावा?
आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात
सेतु केंद्रावर Shravan Bal Seva State Pension Scheme
किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भेट द्या: श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
👉 Aaple Sarkar Portal
स्मरणिका:
अर्ज करताना सर्व कागदपत्रांची छायांकीत प्रत (झेरॉक्स) घेऊन जा आणि अर्ज भरताना सर्व माहिती अचूक द्या.