Maharashtra Poultry Loan Scheme महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना
- आपण जर कुक्कुटपालन करू इच्छित असला तर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून. अर्ज केल्यास बँकेकडून कर्ज मिळू शकते. ती कर्जराशी 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये पर्यंत असू शकते.
 - जर आपण पोल्ट्री व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये. योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रदान करण्यात येऊ शकतात.
 - या योजनेच्या मार्फत मिळणाऱ्या कर्जातून तुम्ही फक्त कुक्कुट पालन सुरू करू शकता.
 - सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील बेरोजगार युवक ज्यांच्याकडून स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
 - ह्या योजने मधून मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बॅंक 7 लाखापर्यंत कर्ज देईल.
 - या योजनेसाठी लोन फक्त सरकारच्या नाबार्ड बॅंक मधूनच अर्ज करू शकतो.
 
कुक्कुटपालन योजनेचा उद्देश
- कुक्कुटपालन योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील वाढती बेरोजगारी आणि कृषी विभागाला चालना मिळणे हा आहे.
 - या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे तो व्यक्ती या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.
 - या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय मिळणार आहे.
 - कुक्कुटपालन चालू झाल्यानंतर शेतकरी मांस आणि अंडी यांचाही व्यवसाय करू शकतो.
 - या कुक्कुट पालन कर्ज योजनेचा लाभ शेतकरी किंवा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही अडचणी शिवाय घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना सावकाराला सामोरे जावे लागणार नाही.
 - या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना आणि व्यक्तींना रोजगार मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.
 
कुक्कुटपालन योजना 2022 ची पात्रता निकष:
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी मर्यादित आहे.
 - एखादा व्यक्ती आधीपासून शेळी पालन मत्स्य पालन हे व्यवसाय करत असेल त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 - कुक्कुटपालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
 - ज्या शेतकऱ्याने आधीच कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
 - शेतकरी असला पाहिजे.
 - महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
 - महाराष्टाचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
 - व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजेत.
 - व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.
 
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड.
 - मतदान कार्ड.
 - रहिवासी दाखला.
 - रेशन कार्ड.
 - सातबारा उतारा.
 - पासपोर्ट साईज फोटो.
 - बँक अकाउंट.
 - नंबर मोबाईल नंबर.
 
How to apply for Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेची अर्जाची प्रक्रिया
- जर आपणास कुकूटपालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास जवळील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन योजनेबद्दल सांगावे लागेल.
 - त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याकडून कर्जाबद्दल माहिती मिळेल व तुम्हाला अर्ज नमुना सुपुर्द करण्यात येईल.
 - तुम्हाला अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि लागणारी कागदपत्रे अधिकार्यांकडे सुपूर्द करावी लागतील.
 - बँक कर्मचारी पुढच्या कुक्कुटपालन व्यवसायाच्या जमिनीला भेटत देतील
 - आपल्या गुंतवणुकीवर बँक 75 टक्के कर्ज तुम्हाला सुपूर्द करते.
 - तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि पडताळणीनंतर तुम्हाला कर्जाची राशी सुपुर्द करण्यात येईल
 
Where to apply for Kukut Palan Yojana
कुक्कुट पालन योजना अर्ज कुठे करायचा?
- सहकारी बँक
 - क्षेत्रीय ग्रामीण बॅंक
 - वाणिज्य बॅंक
 - राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बॅंक
 - सर्व व्यवसायिक बॅंक
 
Benefits of Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेचे फायदे
- कुक्कुटपालन योजनेसाठी मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा खूपच कमी असतो.
 - कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये कमी वेळात चांगला मोबदला मिळू शकतो.
 - कुक्कुट पालन व्यवसायामुळे फक्त वैयक्तिक रोजगारच वाढला नाही तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेतही भर पडली आहे.
 - भारतामध्ये तब्बल तीन लाख शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात.
 - कुक्कुटपालन योजनेतून देशाला वर्षभरात 26 हजार कोटींचा कर जमा होत आहे.
 
	
													












